भिडेंच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून सरकारला ८ दिवसाची मुदत
मुंबईत दलित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी आंदोलन सुरू आहे.
मुंबई : मुंबईत दलित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. मोर्चा काढण्याची परवानगी न दिल्याने, दलित कार्यकर्ते आझाद मैदानावर जमले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आता सरकारला नवीन अल्टीमेटम दिलं आहे. आठ दिवसांच्या आत संभाजी भिडे यांना अटक करा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे, या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे
भिडेंवर कारवाई केली नाही तर विधानसभेला घेराव घालू - प्रकाश आंबडेकर
पुढच्या वेळेस आंदोलनाला येताना १० दिवसाच्या भाकरी बांधून या - प्रकाश आंबडेकर
आम्हाला कैदी करायला निघाणाऱ्यांना आम्ही कैद करू - प्रकाश आंबडेकर
संभाजी भिंडेना आठ दिवसाता अटक करा - प्रकाश आंबडेकर