मुंबई : भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली.  भुजबळ यांच्या वांद्रे येथील एमईटी संस्थेच्या कार्यालयात ही भेट पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सहभागी होण्याची इच्छा आंबेडकरांनी अनेकदा व्यक्त केलीय. मात्र आपल्याला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची आजची भेट ही आघाडीतील समावेशाबाबत चर्चा करण्यासाठी असल्याचे समजते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबेडकरांनी काँग्रेसकडे आघाडीत १२ जागांची मागणी केली आहे. मात्र काँग्रेस त्यांना अमरावतीची जागा द्यायला तयार आहे. त्यामुळे ही चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही.


दुसरीकडे आंबेडकर वारंवार शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी पक्षावर टीका करत असतात. आजच्या भुजबळ भेटीनिमित्त आंबेडकर पवार आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत का? अशी चर्चा आहे.