मुंबई : पावसाळी अधिवेशन संपायला दोन दिवस शिल्लक असताना विरोधक विधिमंडळात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या मुद्यावरुन आक्रमक राहण्याची चिन्हं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताडदेव इथल्या एसआरए घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी मागील आठवडय़ात अधिवेशनात लावून धरली होती. 


मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत आज विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.


विधान परिषदेतही विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. प्रकाश मेहता, सुभाष देसाई आणि सुभाष देशमुख प्रकरणावरुन जोरदार गोंधळ होण्याची शक्यता आहे.


 राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावर विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. या मुद्यावरुन विरोधक सत्ताधा-यांना खिंडीत कसे गाठतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


याशिवाय समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोअर, सातवा वेतन आयोग अशा विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. या सगळ्या मुद्यांवर सरकार काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.