दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या एमपी मिल कंपाऊंडच्या एसआरए प्रकरणी 'झी मीडिया'नं उजेडात आणलेली कागदपत्रांवर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी खळबळजनक स्पष्टीकरण दिलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी निर्णयाला स्थगिती दिलेली असतानाही एसआरएनं बिल्डरला पत्र कसं पाठवलं? याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, असं प्रकाश मेहतांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.


त्या पत्रांबद्दल चौकशीसाठी अधिकाऱ्यांना बोलावलं असल्याचंही मेहतांनी म्हटलंय. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि त्यांनी स्वतः सभागृहात दिलेली माहिती हीच वस्तूस्थिती आहे, असंही मेहतांनी म्हटलंय. 


मेहतांच्या स्पष्टीकरणानं एसआरए घोटाळ्यातलं गूढ आणखी वाढलंय. काल 'झी २४ तास'नं या प्रकरणातील तीन महत्त्वाच्या पत्रांचा पर्दाफाश केला होता. त्यानुसार एसआरएच्या प्रकल्पाला २३ जून २०१७ रोजी मंजूरी मिळाली होती. पण मीडियात बातम्या झळकल्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय रद्द केला. त्यानंतर एमडी बिल्डर कॉर्पोरेशनला एसआरएनं निर्णय रद्द झाल्याचं पत्र दिलं.


या सगळ्या प्रकरणाची कागदपत्रं 'झी २४ तास'नं जगासमोर आणली. पणही पत्र कुणी पाठवली? कशी पाठवली? याबद्दल खुद्द गृहनिर्माण मंत्र्यांनाच कल्पना नसल्यानं प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय. 


पाहा, काय म्हणाले मेहता... त्यांच्याच तोंडून...