ऋचा वझे, झी 24 तास, मुंबई : " या माणसांची वैचारिक दिवाळखोरी झालेली आहे. त्यांना कार्यालयं का उघडतात, याचं ज्ञान झालेलं नाही. त्यामुळे यांनी वेळीच आपला दृष्टीकोन बदलायला पाहिजे अन्यथा ज्यांनी ज्यांनी सेना भवनाकडे वाकडी नजर केली, त्यांना तिथेच त्याच भाषेत उत्तर देण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. त्यामुळे त्यांनी असे मनसुबे कधीच रचु नये" असं म्हणत शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर (Shivsena MLA Sada Sarvankar) यांनी प्रसाद लाड (Prasad Lad)  यांना टोला लगावला आहे. वेळ आल्यास  शिवसेना भवनही (ShivSena Bhavan) तोडू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार (BJP) प्रसाद लाड  यांनी केलं. यावर सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली. (prasad lad is Ideological bankruptcy person, shivsena mla sada sarvankar critisized to bjp prasad lad on shivsena bhavan statement in mahim)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदा सरवणकर काय म्हणाले? 


"त्यांनी कार्यालयांची उद्घाटनं केली. आमच्याही शाखा आहेत. माहिम, दादर नाही तर संपूर्ण मुंबईत आमच्या शाखा आहेत. आम्ही शाखा म्हणजे समाजसेवेचं मंदिर समजतो. गोरगरिबांना शाखेच्या माध्यामातून मदत करण्याचा प्रयत्न करतो. लाड यांनी ज्या कार्यालयांची उद्घाटनं केली, त्या माध्यमातून त्यांनीही गोरगरिबांची मदत आणि सेवा करावी", अशी अपेक्षा सरवणकर यांनी व्यक्त केली. 


"पण ते असं समजत असतील की ही कार्यालय युद्ध खेळण्यासाठी आहेत, माऱ्यामाऱ्या करण्यासाठी आहेत तर तो त्यांचा गैरसमज आहे. मारामारी करण्याची गरज तसेच युद्ध खेळण्याची गरज ही अफगाणिस्तानला आहे. मला असं वाटतं की त्यांनी तिथं जावं",  असंही सरवणकर म्हणाले.  



सेना भवनाबाबत काय म्हणाले? 


"आतापर्यंत सेनाभवनाबाबत अनेक जण भुंकले. पण त्यांना सेना भवनाचं काहीही वाकडं करु शकले नाहीत. कारण इथला शिवसैनिक हा निष्ठावंत आणि कट्टर आहे.  शिवसैनिकांसाठी सेना भवन हे सिद्धीविनायक मंदिरा इतकंच पवित्र आहे, अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे. त्यामुळे त्यांनी सेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं धारिष्ट्य करु नये. त्यांनी असे मनसुबे रचु नयेत. 


लाड काय म्हणाले? 


"भाजपची ताकद काय आहे हे 2014 विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा मतदार होता, तो आज पण भाजपसोबत आहे. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे. यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे. नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना वाटतं की हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु", असं लाड म्हणाले.