मुंबई : शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांना अजून पुण्यातून उमेदवारी जाहीर केलेली नाही. विशेष म्हणजे पुण्यात आपल्यापेक्षा अनुभवी नेते असल्याचे सूचक विधान गायकवाडांनी केले आहे. त्यामुळे नेमकं घोडं कुठं अडलं याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुण्याचा काँग्रेसचा उमेदवार संध्याकाळपर्य़ंत जाहीर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. 



विशेष म्हणजे याच पक्षप्रवेशाच्या सोहळ्यानंतर  रावेरमधून डॉ.उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे पुण्याच्या उमेदवाराबाबत एकमत होत नसल्याचंच यानमित्तानं पुढं आलंय. या पक्षप्रेशाच्या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मल्लिकार्जुन खर्गेंसह पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थिती होते.