मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचसोबत ओमायक्रॉनसही सावट देशावर पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याना पाच मिनिटांचा वेळ दिला आहे. या वेळेत ते त्या त्या राज्याची सद्य परिस्थिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना काही सूचना देणार आहेत.  


मात्र, या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत. राज्याचे मुख्य सचिव देबशिष चक्रवर्ती यांनी पीएम कार्यालयाला तसे कळविल्याची माहिती आहे.


सीएम यांना उपस्थित राहता येत नसून त्या ऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे मिटींगला उपस्थित राहतील असे या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. पंतप्रधान यांनी बोलावलेल्या इतकया महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री कोणत्या कारणात्सव उपस्थित राहणार नाही याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.