मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Prithviraj Chavhan यांनी 'झी चोवीस तास'ला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत काँग्रेसच्या अतर्गंत कलहावर केले भाष्य. सध्या देशात विरोधीपक्ष म्हणुन भुमिकेत असलेल्या काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद आणि कलह झाल्याचे पाह्यला मिळते. पक्षाला एक वर्षाहुन अधिक पक्षअध्यक्ष नसल्याने पक्षाअंतर्गत नाराजीचा सुर उमटलेला पाह्यला मिळतोय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी म्हणावी तितकी चांगली झालेली पाह्यला मिळत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातही काँग्रेसची तशीच काही परिस्थिती दिसते, अनेक नव्या चेहऱ्यांना दिलेल्या संधीमुळे जुनेजाणते नेते मात्र नाराज असल्याचे दिसते. एकेकाळी राज्यात एकहाती सत्ता असणाऱ्या काँग्रेसचे आता मात्र राज्यात पक्ष संघटन पाह्याला मिळत नाही. गुलाम नबी आझाद सारख्या ज्येष्ठ नेत्यांची पक्षातील एक्झिटमुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खरच 'काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचा प्रयत्न'सुरु आहे का? या साऱ्या मुद्द्यावर राज्यातील आणि देशातील पक्षाच्या परिस्थितीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी झी चोवीस तास वर स्फोटक मुलाखत दिली आहे. 


सध्या देश लोकतांत्रिक हुकूमशाहीकडे निघालाय असे मोठे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुलाखतीत केले आहे. आगामी निवडणुकीच्या काळात काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार का? 'जी-23 सोनियांना लिहिलेलं पत्र गुप्त होतं पण ते नेमके कसे समोर आले.. पाहा पृथ्वीराज चव्हाण यांची EXCLUSIVE मुलाखत फक्त Zee24taas वर