मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा पहिला बळी माजी खासदार प्रिया दत्त ठरल्या आहेत. काँग्रेसच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाच्या बैठकीत झालेल्या राड्यानंतर प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव पदावरून दूर करण्यात आले आहे. यासाठी पक्षाकडून कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अंतर्गत गटबाजीतून हा प्रकार घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाच्या बैठकीवेळी प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. हा निर्णय अनेक कार्यकर्त्यांना न रुचल्याने त्यांनी बैठकीच्या ठिकाणाबाहेर गोंधळ घातला. 



२०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रिया दत्त या मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. जर त्यांना २०१९ सालची निवडणूक लढवायची होती तर त्यांनी पराभवानंतर मतदारसंघात लक्ष घालून तेथील जनतेची कामे केली पाहिजे होती. प्रिया दत्त यांनी गेल्या साडेचार वर्षात मतदारसंघात मोर्चेबांधणी तर सोडाच पण साधा कार्यकर्त्यांशीही संपर्क ठेवलेला नाही, असे संतप्त कार्यकर्त्यांनी सांगितले.