मुंबई : Maharashtra Budget Session 2022 : भाजपचे नेते गिरीश महाजन यांना अडकविण्यासाठी मोक्काचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल विधानसभेत ( Maharashtra Legislative Assembly Session) केला. त्यानंतर त्यांनी एक पेनड्राईव्ह अध्यक्षांना दिला. आता फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) उद्या उत्तर देणार आहेत. दरम्यान, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (Proceedings of Maharashtra Legislative Assembly adjourned for the day, reply to Fadnavis' allegations tomorrow)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी विरोधकांनी केली. मलिक यांच्या संदर्भात आम्ही बोलतो पण गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या. तात्काळ राजीनाम्याची घोषणा करा, अशी मागणी विरोधकांनी केली. 
 
मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर राज्य सराकर मलिक पाठीशी उभे आहे. त्याचबरोबर ते दाऊदच्या पाठीशी हे सरकार आहे का, असा सवाल उभा राहील, असा सवाल उपस्थित करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सभागृह गोंधळ झाला. गोंधळानंतर विधानसभेचे कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आले. दरम्यान, राज्यपालांनी फेरविचारार्थ पाठवलेले महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2021 विधानसभेत पुन्हा एकमताने संमत करण्यात आले आहे.


दरम्यान, विधानसभा कामकाज दिवसभर तहकूब करण्यात आल्याने आता फडणवीस यांच्या आरोपावर गृहमंत्री उद्या उत्तर देणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, काल आरोप केले त्यासाठी उत्तर द्यायला मी तयार आहे. आजच्या ऐवजी उद्या उत्तर देणार आहे. त्यामुळे उद्या सरकारकडून काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. गृहमंत्री वळसे पाटील पाटील यावेळेस फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून त्यानंतर कारवाईचे आदेश देऊ शकतात. तसेच सरकारी वकीलांसह ज्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव फडणवीस यांनी घेतले आहे. त्यांच्याही चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे.