Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाची सुरुवातच वादळी झाली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली. गोंधळामुळे राज्यपालांनी सभागृहातील अभिभाषण 5 मिनिटांत संपवलं. आणि राज्यपाल सभागृहातून निघून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गोंधळात सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते विधानपरिषद आमदार संजय दौड यांनी.  आमदार संजय दौंड (MLA Sanjay Daund) यांनी अनोखं आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राज्यपालांचा निषेध करण्यासाठी आमदार संजय दौड यांनी पायऱ्यांवरच खाली खाली डोकं वर पाय करत आंदोलन केलं. राज्यपालांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा निषेध म्हणून मी शिर्षासन करुन त्यांचा निषेध केला अशी प्रतिक्रिया आमदार संजय दौंड यांनी दिली आहे. संजय दौंड हे बीडमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत.


'राज्यपाल राष्ट्रगीताला थांबले नाहीत'
मविआ आमदारांच्या गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषणाच्या प्रथेला फाटा देत विधिमंडळातून निघून गेले. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, अशी नाराजी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. 


राज्यपाल नसून भाजपाल आहेत, त्यांना अधिवेशन चालू द्यायचं नाही, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे. भाषण न करता राज्यपाल निघून गेले, राष्ट्रगीतासाठीही ते थांबले नाहीत अशी टीका करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली.