मुंबई : 'जिओ इन्स्टिट्यूट'ला विशेष दर्जा देण्यास स्वदेशी जागरण मंचाचा विरोध आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जिओ इन्स्टिट्युटला विशेष दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अजून ही संस्था सुरूदेखील झालेली नसताना त्यांना विशेष दर्जा देणं योग्य नसल्याचं स्वदेशी जागरण मंचाचं म्हणणं आहे. 'स्वदेशी जागरण मंच' ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्था आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने आपला निर्णय फिरवावा, अशी स्वदेशी जागरण मंचाची मागणी आहे.  या मुद्द्यावरून समाज माध्यमांमध्ये सरकारची खिल्ली उडवली जात असून सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा, याबाबत स्वदेशी जागरण मंच आग्रही आहे. 


काय म्हणणं आहे 'स्वदेशी जागरण मंचा'चं... 


- जिओ संस्था उघडण्यापूर्वीच उत्कृष्ट संस्थेत कसे काय समाविष्ट केले जाऊ शकतं?


- खास दर्जा का दिला गेला?


- तथ्य न पाहता निर्णय घेतला गेला 


- सरकारचा हा निर्णय अयोग्य आहे


- कोणताही निर्णय बदलता येऊ शकतो


- सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करावा


यावर केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'जिओ इन्स्टीट्यूट'ला तिसऱ्या कॅटगरीत घेतले आहे. ग्रीनफिल्ड कॅटेगिरीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. देशातील शिक्षण सक्षम करणे, नवनवीन संस्थांना प्रोत्साहन देणे आणि वैश्विक स्तरावरील पायाभूत सुविधा भारतात निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलंय.