मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यसरकारनं पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान आज राज्य सरकारनं ऐतिहासिक पुरवणी मागण्या सादर केल्या. ३३ हजार ५२२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे मेट्रोसाठी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. 


विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी कर्जमाफीच्या घोषणा देत सभात्याग केला. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होताना दिसत होते.. दरम्यान सभात्यागानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन करू असं आश्वसन दिलं. शिवाय सरकार चर्चेला तयार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.