75व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सोहळ्याचे आयोजन करण्यात आलय
मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली 13 ऑक्टोबर रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या अमृत महोत्सवी (amrut mahotsav) सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray),केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale),जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ.फारुख अब्दुल्ला (farooq abdullah), लेखक-कवी डॉ.जावेद अख्तर,विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सावंत यांनी लिहिलेल्या छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित 75 निवडक छायाचित्र पुस्तिका-फोटो बायोग्राफीचे देखील मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच राज्यभरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत.यामध्ये विशेषतः सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम राज्यभर घेतले जाणार आहे.