मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील फोर्ट शाखेतून 11 हजार 500 कोटींचा अपाहार उघड झालाय. याप्रकरणी सीबीआयनं बडा हिरा व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्यासह सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केलीय. 


नीरव मोदी, मेहूल चोकसीसह ६ जणांविरोधात एफआयआर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी आतापर्यंत पंजाब नॅशनल बँकेच्या 10 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. या अपहार उघड झाल्यावर पंजाब नॅशनल बँकेनं सेबी आणि मुंबई शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांना बुधवारी लेखी पत्राद्वारे माहिती कळवलीय. 


सर्व बँकांनाही अशा अपहारांबद्दल सावधानतेचा इशारा


झालेल्या अपहारानंतर पंजाब नॅशनल बँकेनं देशातल्या सर्व बँकांनाही अशा अपहारांबद्दल सावधानतेचा इशारा दिलाय. अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही.