मुंबई : मुंबईमधील भायखळातल्या राणीच्या बागेत  सध्या प्रवेश शुल्क ५ रुपये आहे. मात्र, उद्यापासून हे दर प्रत्येक व्यक्तीसाठी थेट ५० रुपये इतके करण्यात येणार आहेत. राणीच्या बागेतील पेंग्विनला पाहण्यासाठी करण्यात आलेली शुल्कवाढ उद्यापासून लागू होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अखेर पालिकेनं बैठक घेऊन पेंग्विन दर्शनाच्या शुल्कात वाढ केली. ती शुल्कवाढ उद्यापासून लागू  होणार आहे. या वाढीवर मुंबईकरांकडून मात्र टीका होत आहे. तीन महिन्यांपूर्वी बीएमसीनं राणीच्या बागेत पेंग्विन आणले, त्यावेळी पेंग्विन दर्शनाचे दर निश्चित केलेले नव्हते. 


याशिवाय आई-वडील, २ मुलं अशा पूर्ण कुटुंबासाठी १०० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी २५ रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे.