वसई : येथील माणिकपूर परिसातील पेट्रोलपंपवर तुफान राडा झाला. वसई पश्चिमेकडील या पेट्रोलपंपावर १० ते १२ जणांनी धिंगाणा करत पेट्रोलपंपची तोडफोड केली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मास्क नसल्यामुळे पेट्रोल देण्यास पेट्रोलपंपचालकांनी नकार दिला. हा राग मनात धरुन तरुणांनी पेट्रोलपंपवर येवून तोडफोड केली. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई पश्चिमेकडील माणिकपूर येथील भारत पेट्रोलीयन पंपावर पेट्रोल भरण्यासाठी विना मास्क आलेल्या तरुणांनी पंपाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. शुक्रवारी रात्री साडे सात वाजताच्या सुमारास नालासोपारा येथे राहणारे १० ते १२ तरुण दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. दरम्यान या तरुणांनी मास्क न लावल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्या पेट्रोल देण्यास नकार दिला. या गोष्टीच्या रागातून तरुणांनी पंपावर तुफान राडा घातला.  


यावेळी कर्मचाऱ्यांना मारहाण करून पंपावरील सामानाची आणि फिलिंग मशीनची तोडफोड केली. हा सर्व प्रकार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत. 


0



दरम्यान, नालासोपारा येथील गावगुंडांचा धिंगाणा यापूर्वीही पाहायला मिळाला होता. तीन महिन्यांपूर्वी नालासोपाऱ्याच्या प्रगती नगर येथील गुंडप्रवृत्तीच्या तरुणांनी भर दिवसा तलवारी नाचवत एका तरुणाला मारहाण केली होती.