Rahul Gandhi Statement on Veer Savarkar : काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात (Maharashtra) आली, महाराष्ट्रात येऊन राहुल गांधींनी हिंगोलीच्या सभेत सावरकरांवर (Vinayak Damodar Savarkar) टीका केली, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली असा हल्लोबाल राहुल गांधींनी केला, त्यानंतरच्या प्रत्येक सभेत आणि पत्रकार परिषदेत राहुल गांधी सावरकरांवर टीका करतायत. राहुल यांच्याकडून सावरकरांवर सातत्यानं होणाऱ्या टीकेनंतर राज्यातलं राजकारण पेटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते  विचार जमिनीत गाडणार - देवेंद्र फडणवीस
राहुल गांधींच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जो पर्यंत सावरकरांना अपमानित करणारे या देशात आहेत, त्यांचे विचार जमिनीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. राहुल गांधी सावरकरांबद्दल इतकं नीच बोलतात, आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पदयात्रा करतात, स्वर्गात बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल, अशा शब्दात फडणवीस यांनी टीका केली आहे. 


भाजपसह मनसे उतरली रस्त्यावर
एकीकडे फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केला तर दुसरीकडे भाजप, शिंदे गटाचे कार्यकर्ते राहुल यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले. राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधींच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या विधानानंतर मनसे (MNS) रस्त्यावर उतरली आहे. मुंबईतून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कार्यकर्ते शेगावकडे रवाना होत आहेत. उद्या राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा होणार आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. 


हे ही वाचा : Bharat Jodo Yatra : सरकारला 'भारत जोडो यात्रा' रोखावी वाटत असेल तर... Rahul Gandhi यांचं आव्हान


उद्धव ठाकरे यांचा सावध पवित्रा
तर राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचा सावध पवित्रा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतला. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. सावरकरांबद्दल प्रेम, आदर आणि निष्ठा आहे. पण स्वातंत्र्यसंग्रामाशी ज्यांचा संबंध नाही त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. सावरकरांच्या विचारावर वागायला शिका, मगच बोला असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.


आतापर्यंत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा मुख्य रोख हा भाजप सरकारच्या काळातील देशातील धार्मिक-जातीय वातावरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, उद्योगधंदे यावर होता. पण पहिल्यांदाच राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान सावरकरांचा मुद्दा इतक्या तीव्रपणे मांडला गेलाय. त्यामुळे भारत जोडो यात्रेचा फोकस भरकटतोय की काय अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु झालीय.