मुंबई : मुंबईतल्या स्थानकांवरचे अनेक एस्कलेटर रात्री १० नंतर बंद असतात. या झी मीडिय़ाच्या बातमीनंतर खुद्द रेल्वेमंत्र्यांनी दखल घेऊन हे एस्कलेटर रात्री १० नंतरही सुरू ठेवण्याचे आदेश दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता झी २४ तासने यापुढे जाऊन बंद एस्कलेटर कधी सुरू होणार असा सवाल विचारलाय. अनेक स्टेशनवर रेल्वेतर्फे नवे एस्कलेटर बांधून तयार आहेत. 


मात्र परवानग्यांची वाट पाहात ते एस्कलेटर पडून आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.