एलफिन्स्टन दुर्घटना: रेल्वेची मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत
मुंबईतील एलफिन्स्टन ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेने या दुर्घटनेतील पिडितांना मदत दिली आहे.
मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेने या दुर्घटनेतील पिडितांना मदत दिली आहे.
रेल्वेची मदत
रेल्वेने एकूण २६ पिडितांना ही मदत दिली आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, ही मदत मिळायला आणि संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी २ ते ४ वर्षांचा कालावधी लागतो. पण यंदा मात्र ही प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात आली. असं पहिल्यांदा झालं आहे की, जेव्हा दावा करण्यासाठी कोणताही वकील नाही आला.' ही मदत एकूण १४ मृतांच्या नातेवाईकांना आणि १९ जखमींना देण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना ८ लाख रुपये तर जखमींना २५ ते ८ लाखांपर्यंतची मदत दिली गेली.
२३ जणांचा मृत्यू
२०१७ मध्ये मुंबईतील परळ आणि एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील ब्रिजवर चेंगराचेंगरीमुळे २३ लोकांना मृत्यू झाला होता. या प्रकरणात पश्चिम रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्या अध्यक्षतेतील समितीने तत्कालीन महाप्रबंधक अनिल कुमार यांना रिपोर्ट सोपवला ज्यात या घटनेसाठी कोणालाही दोषी ठरवण्यात आलं नाही. यामध्ये ३० जखमींचा जबाब नोंदवला गेला.
जोरदार पावसामुळे झालेला गोंधळ
समितीच्या रिपोर्टनुसार, 'जोरदार पाऊस आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. तिकीट काऊंटवर उभे असलेले लोकं देखील पावसापासून वाचण्यासाठी पायऱ्यांकडे गेले. जेथे आधीपासूनच खूप गर्दी होती. ज्यांच्याकडे खूप सामान होतं अशा लोकांचा तोल गेला आणि चेंगराचेंगरी झाली.'