मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या वेळेत सुटणारी डाउन जलद सेवा  माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुढे  जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळविल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानावर येतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्याहून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ पर्यंत सुटणारी अप जलद सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील.  पुढे या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. 


पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक आहे. नेरूळ /बेलापूर-खारकोपर मार्ग वगळता हा मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. 


पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी मार्गावर ब्लॉक दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.