आज मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी आज मेगा ब्लॉक आहे.
मुंबई : रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी आज मेगा ब्लॉक आहे.
मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील वाहतूक दिवा आणि परळ स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल.
रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकापंर्यतच
ब्लॉक दरम्यान दादर-सीएसटीएमवरील सर्व मेल आणि एक्स्प्रेस मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावरुन चालविण्यात येतील. तसंच रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकापंर्यतच धावणार आहे.
अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर
तेथूनच रत्नागिरीसाठी परतीच्या प्रवासासाठी चालवण्यात येईल. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 9.53 ते संध्याकाळी 5.09 वाजेपर्यंत सीएसएमटी ते वडाळा, अंधेरी आणि बांद्रा दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत.