Mumbai Local Train : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रविवार हा त्रासदायक ठरतो. यंदा देखील रविवारी म्हणजे 30 एप्रिल रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणर आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे तर्फे हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.  मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर CSMT ते कुर्ला दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान  कुर्ला स्थानकातून पनवेलसाठी विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. 


डाउन जलद मार्गावरील सेवा धीम्या मार्गावर वळवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी  10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यानंतर या लोकल संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. यानंतर ठाण्याहून पुढे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या कालावधीत लोकल 15 ते 20 मिनीटे उशीराने धावणार आहेत.


हार्बर मार्गावर असा आहे मेगाब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन  हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी  4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून  सकाळी  11.16 ते सायंकाळी  4.47 या वेळेत वाशी,बेलापूर तसेच पनवेल करीता सुटणारी तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी  4.43 वाजेपर्यंत  वांद्रे  तसेच गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.


पनवेलसाठी विशेष लोकल


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


दरम्यान, या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला या मार्गावर विशेष लोकल चालवल्या जाणार आहे. कुर्ला रेल्वेस्थानकातून प्लॅटफॉर्म क्र. 8 येथून पनवेलसाठी या विशेष लोकल सोडल्या जाणार आहे. दर, 20  मिनिटांनी या लोकल सोडल्या जाणार आहेत.  हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी  10.00  ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.