Mumbai News : मुंबईत रेल्वेने (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा प्रवासी आणि टीसी यांच्यात नेहमी वाद होतच असतो. टीसीबरोबर (Railway TC) वाद घालताना अनेकदा तोंडावर ताबा राहत नाही. मात्र आता प्रवाशांना टीसीसोबत वाद घालताना थोडं विचारपूर्वक बोलाव लागणार आहे. नाहीतर टीसी सोबतच्या वादामुळे तुम्हाला तुरुंगात जाण्याची देखील वेळ येऊ शकते. याचे कारण म्हणजे मध्य रेल्वेने (Central Railway) तिकीट तपासणीसाठी बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कॅमेराच तुम्ह टीसीसोबत भांडतांना कोणत्या भाषेचा वापर करता हे देखील रेकॉर्ड होणार आहे. परिणाणी हे रेकॉर्ड तुमच्या विरुद्ध पुरावा ठरु शकतो. त्यामुळे तुमच्याकडे लोकल प्रवासाचे तिकीट नसेल आणि तुम्हाला टिसीने विनातिकीट पकडले तर थोडं सांभाळूनच टीसीसोबत वाद घाला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेने प्रवास करताना पास, जनरल तिकीट किंवा आरक्षण तिकीट आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असता तेव्हा टीसी तुमचे तिकीट तपासते. जर प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये विनातिकीट आढळल्यास दंड आकारला जातोच. हा दंड रेल्वेच्या विहित नियमांनुसार आहे. मात्र यापुढे आता एवढेच मर्यादित राहणार नाही. कारण मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये एकूण 1200 तिकीट तपासनीस आहेत. यापैकी प्रायोगिक तत्त्वावर 50 तिकीट तपासनीसांना खांद्याजवळ बॉडी कॅमेराचे वाटप करण्यात आले आहे. 


वाचा : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी, गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय


“पारदर्शकता राखण्यासाठी आणि तिकीट तपासणीबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी टीसीच्या खांद्याजवळ कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कॅमेरामध्यटे महिनाभराचं रेकॉर्डिंग ठेवण्यात येणार आहे. तिकीट तपासणीमध्ये काही विसंगती आढळल्यास किंवा प्रवाशांच्या काही तक्रारी असल्यास व्हिडिओचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. 


बॉडी कॅमेरे


बॉडी कॅमेरे तिकीट तपासणी दरम्यान पारदर्शकता राखण्यात मदत करतील आणि गैरवर्तन आणि हिंसक कृत्ये रोखण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे तिकीट तपासणी दरम्यान कोणतीही तफावत आढळून येण्यास किंवा विशेषत: तक्रारी आल्यास मदत होईल या हेतूने टीसींच्या खांद्यावर कॅमेरा बसविण्यात येणार आहे. 


ऑनलाईन पेमेंट दंड


यासह तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसाठी बॉडी कॅमेर्‍यांसह SBI YONO अॅपद्वारे प्रवाशांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी UPI/QR कोड पेमेंट सिस्टम सादर करून नवीन तिकीट तपासणी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच SBI YONO अॅप प्रवाशांना UPI/QR कोड प्रणालीद्वारे तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना पेमेंट करण्यास मदत करेल ज्यामुळे रोख हाताळणी कमी होईल आणि डिजिटल इंडिया मिशनने प्रोत्साहन दिल्याप्रमाणे सुरक्षित आणि सुरक्षित व्यवहार देखील प्रदान केला जाईल.