मुंबईत पावसाची विश्रांती, रस्ते वाहतूक हळूहळू सुरू
तब्बल १२ तासांनंतर मध्य रेल्वे मार्गावरून तीन विशेष गाड्या सोडल्या गेल्यात तर पश्चिम, हार्बरची वाहतूक उशिरानं पण सुरू करण्यात आलीय
मुंबई : मुंबईत रस्ते वाहतुकीला सुरूवात झालीय. पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झालीय. दुपारी २.०० - ३.००० वाजल्याच्या दरम्यान पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे रस्त्यावरील पाणी ओसरण्यास सुरूवात झालीय. रस्ते वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. पाऊस थांबल्याने मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
भरतीच्या वेळीच पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. मुंबईचा पाऊस ठाणे सौराष्ट्र सरकला असल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय.
रेल्वे हळूहळू मार्गावर
तब्बल १२ तासांनंतर मध्य रेल्वे मार्गावरून तीन विशेष गाड्या सोडल्या गेल्यात तर पश्चिम, हार्बरची वाहतूक उशिरानं पण सुरू करण्यात आलीय.
'बेस्ट'ही पाण्यात
दरम्यान, मुंबईत बेस्टच्या तब्बल ५८ बसगाड्या पाण्यात अडकल्या. यातील ४२ बसेस बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. दोन दिवसांत एकूण १५८ बसगाड्या नादुरूस्त झाल्याने रस्त्यात अडकल्याचं समजतंय.