मुंबई : ठाकरे कुटुंबात लवकरचं नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरचं आजोबा होणार आहेत.  राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांच्याकडे 'गुडन्यूज' असल्याची माहिती समोर आली आहे. मिताली ठाकरे गरोदर आहेत. एप्रिल महिन्यात 'शिवतिर्थावर' नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे 'शिवतिर्थावर' बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर अमित ठाकरे यांच्याकडे  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपविण्यात आली.  मनसेने रविवारी पत्रक काढून याबाबतची घोषणा केली होती. 



प्रोफेशनल जीवनासोबतचं अमित ठाकरे यांचं खासगी आयुष्यात देखील प्रमोशन होणार आहे. असं म्हणायला हरकत नाही. मिताली ठाकरे सध्या मुंबईत आहेत. त्यांचं माहेर देखील मुंबईचं आहे. त्यामुळे बाळाचा जन्म देखील मुंबईतचं होईल.  



अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांचं लग्न 2019 मध्ये झालं. दोघांच्या लग्नात देशातील अनेक दिग्गज, प्रतिष्ठित आणि राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली. दोघांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र तुफान रंगली होती.