COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेचाच हा व्हिडीओ आहे. मनसेचे 6 नगरसेवक फुटून शिवसेनेत गेल्यानंतर, राज ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेतली. 


या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मी असं राजकारण कधीही गेली नाही, आता हातावर टाळी देण्याचा प्रश्नच राहिला नाही, आता गालावरच टाळी देऊ असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.


 एवढंच नाहीतर राज ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांना देखील टार्गेट केले आहे. किरीट सोमय्या हे पुढे पुढे करायचे म्हणून बाळासाहेबही त्यांना क्रेडिट सोमय्या असं म्हणायचे, असं यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.