मुंबई :   मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सून मिताली बोरुडे (Mitali Borude) यांच्या जीवनात काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याने प्रवेश केला. आता राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव 'किआन' असं ठेवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे राज ठाकरे यांच्या नातवाच्या नावाचा अर्थ? 
सध्या शिवतीर्थावर आनंदाचं वातावरण आहे. 'किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे. किआन नावाचा अर्थ म्हणजे देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असा आहे... राज ठाकरे यांच्या नातवाच्या नावाची एक झलक समोर आली आहे. 



किआन नावाचा बोर्ड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  सांगायचं झालं तर, गेल्या महिन्यात 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला. मिताली राज यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला. पहिल्या नातवाच्या आगमनाने शिवतीर्थावर आनंदाचं वातावरण होतं.


दरम्यान अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचं लग्न 27 जानेवारी 2019 साली झालं. मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्या अनेक तिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती.