मु्ंबई :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले संजय राऊत
राज ठाकरे भाजपचा भोंगा आहेत, ईडीच्या कारवाईनंतर भाजपने त्यांना सूट दिली आहे, त्यानतंर हा भोंगा वाजायला लागला आहे. दीड वर्ष हा भोंगा बंद होता. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. हिंदुत्व शिवसेनेच्या रक्तात आहे. हिंदुत्वावर जेव्हा जेव्हा हल्ला झालेला आहे तेव्हा भाजप आणि भाजपचे हे नवे भोंगे समोर नव्हते, शिवसेना होती असं उत्तर संजय राऊत यांनी दिली आहे. 


राज्य सरकारला कोणी अल्टीमेटम देऊ शकत नाही, अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती या महाराष्ट्रात. बाळासाहेब ठाकरे यांनी या देशातील अतिरेक्यांना अल्टिमेटम दिला होता अनेकदा.


जे आमच्याशी थेट लढू शकत नाहीत, ते अशा प्रकारे भोंगे लावून माहोल निर्माण करतायत, ईडीच्या नावाने कथक करत होते, ईडीच्या कारवाईबाबत केंद्राकडून अभय मिळाल्यामुळे हा भोंगा वाजू लागला आहे. आम्ही खोट्या कारवाईविरोधात लढतोय, आम्हाला काळजी नाही. आमच्या नकला करा, आमची मिमिक्री करा, शिवसेना आणि मविआ भक्कम आहे, आणि मजबूत आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


एका वैफल्यातून, निराशेतून अशा प्रकारचे भोंगे वाजतायत, भारतीय जनता पक्षाने जेव्हा आमच्या विरोधात भोंगे वाजले, त्या भोंग्याचा उपयोग झाला नाही. म्हणून नविन भोंगे लावले. त्याचाही काय उपयोग होणार नाही. 


संजय राऊत हे शिवराळ भाषा वापरतात. त्या भाषेचं काल कौतुक व्हायला हवं होतं, कारण ते मराठी भाषेचं अभिमान म्हणून कालपर्यंत वावरत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच तारणहार आहोत, शिवसेना नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. माझ्या शिवराळ भाषेचं त्यांनी अभिनंदन केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं मराठी प्रेम दिसलं असतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.