`कोरोनाची एवढी भीती वाटतेय तर निवडुणका पुढे ढकला `
सरकारला सुनावलं
मुंबई : 'कोरोनाची एवढी भीती वाटते तर मग निवडणुका पुढे ठकला', असे खडेबोल राज ठाकरे (Raj Thackeray) सरकारला सुनावले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मराठी भाषादिनानिमित्त 'मराठीत स्वाक्षरी करा' ही मोहिम राबवली होती. यावेळी राज ठाकरेंनी सरकारला खडेबोल सुनावलं आहे. राज ठाकरेंच्या या कार्यक्रमाला पोलिसांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परवानगी नाकारली होती.
काय म्हणाले राज ठाकरे?
खरं तर सरकारच्या मनात अभिजात मराठी भाषेबद्दल बदल करायचे आहेत की नाही. फक्त मराठी भाषा दिनाच्या दिवशी बोलायचं. म्हणजे औरंगाबादचं संभाजी नगर करायचं हे जसं बोललं जातं. तसंच काहीसं आहे. मराठी स्वाक्षरीची मोहिम खूप मोठ्या प्रमाणात करायची आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की,'सगळ्यांनी आपली स्वाक्षरी मराठीत करावी. हे सगळ्या ठिकाणी झालं पाहिजे.'
त्याचप्रमाणे कोरोनाची एवढी भीती वाटते तर मग निवडणुका पुढे ढकला? असा सल्ला देखील राज ठाकरेंनी यांनी दिला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पत्रकारांनी आपण मास्क का घालत नाही? असा सवाल विचारला त्यावर राज ठाकरे म्हणाले,'मी मास्क कधीच घालत नाही. तुम्ही पण नका घालू', असा सल्ला पत्रकारांना दिला.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnriman Sena) 'मराठीत करा स्वाक्षरी' ही मोहिम सुरू केली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मनसे आणि राज ठाकरेंनी (Raj Thackeray on Government and Marathi Bhashan Din) हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी मराठीत स्वाक्षरी केली. मराठी भाषा जपण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवे. 'सगळ्यांनीच सगळ्या ठिकाणी मराठीत स्वाक्षरी करा', असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.