मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईतल्या गोरेगावमध्ये होत आहे. यानिमित्त गोरेगावमध्ये मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून, राज्यभरातून मनसैनिक या मेळाव्यासाठी येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवसभर याठिकाणी उपस्थित राहणार असून, संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. पक्षाचा झेंडा आता भगवामय झाला असून, मनसे हिंदुत्वाकडे वळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असेल अशी माहिती मिळत आहे. आधी असलेल्या झेंड्यामधील तीन रंगाचा झेंडा हटवण्यात येणार असल्याचं समजतं आहे. मनसेच्या अधिकृत फेसबुक ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ झेंडा काढून केवळ इंजिनाचा फोटो दिसतोय. आज २३ जानेवारी रोजी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण होणार आहे.