मुंबई : संप मागे घेतल्यानंतर राज्यातील एसटीची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर प्रवाशांना दिलासा मिळालाय. मात्र, या संपावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार टोला आपल्या व्यंगचित्रातून हाणला आहे. संप मागे घेतला तरीही वस्तुस्थिती तीच राहणार, असे फटकारलेय.


सरकार टायरमुळे टायर्ड! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे


एसटी कर्मचाऱ्यांना पुकारलेला संप अखेर मागे घ्यावा लागला आहे. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई  उच्च न्यायालयाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी न्यायालयाने राज्य सरकारलाही फटकालेय.


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपाची पुढची दिशा ठरविण्यासंदर्भात एसटी संघटनेची शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरु होती. या बैठकीत न्यायालयाच्या आदेशाचं पालन करुन संप मागे घेण्याचा निर्णय  झाला. त्यानंतर कामगार संघटनेने एक  प्रसिद्ध पत्रक काढून हा संप मागे घेत असल्याचे म्हटले.


एसटी संप बेकायदेशीर 


दरम्यान, चार दिवस चाललेला एसटी संप बेकायदेशीर असल्याचं मत न्यायालयाने नोंदवत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात तातडीने राज्य सरकारला समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय संघटनेशी चर्चा करण्याचेही आदेश दिल्याने संप मागे घेत आहोत, असे एसटी कर्मचारी संघटनेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकार नमूद केले आहे. 


एसटीचा सुरु असलेला संप प्रथमदर्शनी बेकायदेशीर असल्याचे मत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबग तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.