मुंबई : Raj Thackeray on upcoming elections : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. आगामी निवडणूक मनसे (MNS) स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश कार्यकर्त्यांना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिले आहेत. तर उद्धवला सहानुभूती हा भ्रम आहे, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंना सहानुभूती हा भ्रम आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. जनतेशी प्रतारणा करणाऱ्यांना सहानुभूती मिळतेय, अशी तोफ राज ठाकरे यांनी डागली. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.


मुंबईतील रंगशारदा’मध्ये पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करा, असा आदेश दिला. निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा आपण उभा करु, असेही ते म्हणाले. आताच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत, लोक पर्याय म्हणून आपला विचार करतील, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा, असे राज यांनी यावेळी सांगितले. आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचेय, त्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.


 जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागतील. आपल्याकडे आता पाच महीने आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, असं राज यांनी म्हटले आहे. ठाकरे यांचा दसरा मेळावा लाखो लोकांनी पाहिलाच नाही, असा दावा राज यानी केला आहे. मनसेला आगामी निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवायचं आहे, असं राज म्हणाले. विजयापर्यंत कसं घेऊन जायचं ती जबाबदारी माझी असा एल्गार राज यांनी केला. मी तुम्हाला विधानसभेत सत्तेत बसवणार, लोकसेभत सत्तेत खासदार म्हणून बसवणार फक्त तुम्ही सकारात्मक विचार करा असं राज यांनी म्हटले आहे.