महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकींसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. एवढंच नव्हे तर राज ठाकरे यांनी नुकतीच कणकवली येथे नारायण राणेंसाठी सभा घेतली. ही सभा चांगलीच गाजली असं असताना राज ठाकरे यांचा एका मुलाखती दरम्यानचा किस्सा चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे हे खूप कमी वयापासून राजकारणात सक्रीय आहेत. तेव्हापासून महाराष्ट्रभर दौरा आणि सभांमुळे ते घराबाहेर असायचे. राज ठाकरे यांची 'बोल भिडू' या युट्यूब चॅनलवर लेखक अरविंद जगताप यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना 'बाबा कुठे' असा प्रश्न विचारला तेव्हा ते काय सांगत? हा किस्सा शेअर केला आहे. 


काय आहे तो किस्सा? 


अमित ठाकरे दोन वर्षांचे असताना राज ठाकरे प्रचंड कामात आणि सभा, दौऱ्यांमध्ये व्यस्त होते. यावेळी अमित ठाकरे यांना 'बाबा' म्हणून राज ठाकरे यांची एक फोटो फ्रेम दाखवली जात असे. मुलगा अमित ठाकरे लहान होते तेव्हा त्याला 'बाबा' हे फक्त फोटोतीलच माहित होते. कारण प्रत्यक्षात राज ठाकरे यांचा घरी वावर कमी असायचा. 


एक दिवशी राज ठाकरे दौऱ्यावरून घरी आले तेव्हा त्यांना त्यांच्या आईने अमित ठाकरे यांना 'बाबा कुठे' असा प्रश्न विचारायला सांगितला. तेव्हा राज ठाकरे यांनी अमित यांना कडेवर उचलून घेतले आणि 'बाबा कुठे' असा प्रश्न केला? वडिलांच्या अगदी जवळ असलेल्या अमित ठाकरे यांनी फोटो फ्रेमकडे बोट दाखवत 'हा बाबा' असं उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी 1992 सालचा हा किस्सा मुलाखतीत सांगितला. 


बाप-लेकाचं नातं 


राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं नातं आपण जवळून पाहतो. वडिलांसोबत अमित ठाकरे खंबीरपणे राजकारणात साथ देत आहेत. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांचं नातं जगासमोर आलं आहे. मुलगा आणि वडिल यांच्या नात्यावर फार कमी बोललं जातं. अनेकदा वडिल आणि मुलं दोघंही आपल्या भावना मोकळेपणाे बोलताना दिसत नाही. राज ठाकरे यांनी या किस्स्यामधून हेच सांगितलं आहे की, मुलांना लहानपणी सर्वात जास्त आई-वडिलांची गरज असते. अशावेळी त्यांना साथ देणे अत्यंत गरजेची आहे. 


वडिलांनी मुलांसाठी या गोष्टी नक्की कराव्यात


  • प्रत्येक मुलासाठी त्याचा बाबा हा सुपर हिरो असतो. त्यामुळे बाबाने मुलांसमोर वागताना, बोलताना या गोष्टींचा भान ठेवूया. 

  • तसेच वडिलांनी मुलांना कायम सर्वात जास्त वेळ देणं अपेक्षित आहे. 

  • मुलांसोबत त्यांच्या वयाचे होऊन खेळण्यात एक वेगळाच आनंद लपलाय.