मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. हाफकिन संस्थेला (Halfkin Institute) लस उत्पादन करण्याची मान्यता द्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली होती. केंद्र सरकारतर्फे आता हाफकिनला लस उत्पादनाची मान्यता देण्यात आलीय. त्यानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे ट्वीटरवरुन आभार मानले आहेत.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण या संकटावर सहज मात करू हे नक्की असंही ते पुढे म्हणाले.


हाफकिनला मान्यता 


हाफकिन संस्थेला (Halfkin Institute) भारत बायोटेककडून (Bharat Biotech) तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन (covacin) बनविण्यास मान्यता देण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांनी मानले आभार 



केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून (Central Government's Department of Science and Technology) ही मान्यता दिली आहे. दरम्यान, आपल्या विनंतीचा स्वीकार करुन केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते. असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.


विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरुप यांनी काल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली आहे.


कोवॅक्सिन बनविण्यास एक वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन (Halfkin Biopharma Corporation) यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे. 


यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.