राज ठाकरे उद्या लिलावतीत ऍडमिट, १ जूनला शस्त्रक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. हा दौरा पुढे ढकलण्यासाठी त्यांनी पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे कारण सांगितले होते.
राज ठाकरे यांच्या पायाला काही महिन्यांपूर्वी टेनिस खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी राज्यातील काही भागात दौरे केले. याकाळातच राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली.
मात्र, याच काळात राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे पुन्हा वाढले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे राज यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला.
याच दुखऱ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी राज ठाकरे उद्या सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार आहेत. १ जूनला त्यांच्या राज ठाकरे यांच्या पायावर छोटीशी शस्त्रक्रिया होणार आहे.