मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे फेसबूकवर सक्रीय झाल्यानंतर त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून फटकारण्यास सुरुवात केली आहे. या त्यांच्या व्यंगचित्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता दिवाळी निमित्ताने चेहरे मोहरे हे अर्कचित्र प्रदर्शन' १९९९ साली भरवलं होतं. त्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवाळी विशेष सदर २०१७ असा उल्लेख करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्याचं मोठं काम व्यंगचित्रं करत असतात आणि एका अर्थी राज्यकर्त्यांना आणि समाजाला वठणीवर आणत असतात. परंतु सध्याचं एकूण राजकारण पाहता व्यंगचित्रकाराला आपलं काम करणं कठीण होऊन बसलंय असं वाटतं, असे राज ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र राज ठाकरेंच्या फटकाऱ्याने अनेक जण घ्यायाळ झालेत.


#कलासक्तवारसा |  



राज ठाकरेंनी स्वत: च्या अर्कचित्रांच 'चेहरे मोहरे अर्कचित्र प्रदर्शन' १९९९ साली भरवलं होतं. याला कलाप्रेमींचा मोठा दिला. त्याच प्रदर्शनाची ही चित्रफित. तसं पाहिलं तर असते 'माणूस' हीच जातकुळी, पण एकसारखा नसतो दुसरा, दुसरी. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची काही खासियत. चॅप्लिनची टोपी, हिटलरची मिशी, राबडीदेवींचे स्मितहास्य वा अमिताभची उंची. दाखवताना व्यंगचित्रातून नेमके त्यावर बोट ठेवलेय.