मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता सोशल मीडियावर उपलब्ध होणार आहेत. त्याचे अधिकृत फेसबूक पेज लॉन्च झालेय. राज ठाकरे यांचे फेसबूक पेज व्हेरीफाय झाले सुद्धा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज ठाकरे फेसबूक पेजला आतापर्यंत ४.५ लाखापेक्षा जास्त लाईकही मिळाल्यात. उद्या दि. २१ सप्टेंबर घटस्थापनेच्या दिवशी राज ठाकरे फेसबूक लाईव्ह करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष लागलेय.


राज ठाकरे घटस्थापनेच्या दिवशी आपले स्वत:चे फेसबूक पेज लाँच करणार आहेत. मुंबईतील दादरमधील रवींद्र नाट्य मंदिरात सकाळी १०.३० वाजता फेसबूक पेज लाँचचा सोहळा होणार आहे.


राज ठाकरे या फेसबुक पेजवरून राजकीय भूमिका मांडणार आहेत. वेगवेगळ्या मुद्यांवर दैनंदिन घडणाऱ्या घटनांबाबत ते आपली भूमिका मांडतील. सोबत भाषणेही लोकांसाठी उपलब्ध करुन देतील. मात्र, त्यासोबतच ते एक कलाकार आहेत. त्यामुळे व्यंगचित्र व इतर छंदाच्या गोष्टी आपल्या फॅन-फॉलोईंगसमोर ठेवतील, अशी शक्यता आहे.