मुंबई : ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ (द्वितीय) यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 96व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर जगभरातून दुःख व्यक्त केला जातोय आणि सोबतच राणी एलिझाबेथ यांच्या भेटींना उजाळा देण्यात येतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राणी एलिझाबेथ यांच्या भेटींदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणी एलिझाबेथ यांच्या निधनांनंतर महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राणी एलिझाबेथ यांचयासाठी एक ट्विट केलं आहे. 



काय म्हणाले राज ठाकरे: 


" ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे. 


ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मागरिट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.


कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ २ ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ २ ह्यांच एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाचं असेल. एलिझाबेथ ह्यांच्या स्मृतीस अभिवादन. "


raj thackerays reaction on queen elizabeth two says its an end of an era or start of new era