Raj Thackeray : गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलं आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना राज ठाकरे म्हणालेकी, मला एक खून माफ करा. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचा आहे. आरे सगळ्यांना फोटो देणे शक्य होत नाही. दरवेळी येऊन फोटो काढणे हा एक आजार आहे. कुठे तरी या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत असं मला वाटतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्याकडून रतन टाटांना श्रद्धांजली


कित्येक दिवस मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटलो नाही त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पुढच्या दौऱ्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त भेटण्याचा प्रयत्न करीन. जगात खूप कमी पाय उरलेत, ज्यांच्या पाया पडावसं वाटतं म्हणत राज ठाकरेंनी मेळाव्यात रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक वेळा त्यांना मी भेटलो. अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. रतन टाटा हे देशाचे मानबिंदू होते. रतन टाटांकडून जगाला अनेक गोष्टी मिळाल्या. 



वनखात्याच्या जमिनीकडे दुर्लक्ष केलं तर झोपड्या होणार. त्यासाठी मी रतन टाटांकडे एक आराखडा घेऊन गेलो होतो. त्याचे बजेट 3.5 कोटी रुपये होते. मात्र, बजेट वाढतंय काय करायचं असं रतन टाटा कधी म्हणाले नाहीत. ते बजेट 3.5 कोटींवरून 14 कोटींवर गेलं पण रतन टाटा थांबले नाहीत. उलट ते म्हणाले अजून काही असेल तर सांगा. मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. त्यानंतर मी त्यांना दुसरा प्रोजेक्ट सांगितला. तो म्हणजे वरळीपासून ते माहिमपर्यंतचा अख्खा प्रोजेक्ट त्यांना मी सांगितला. त्यांनी सगळी माणसं कामाला लावली. पण आपल्याकडे काय आहे. एखादी गोष्ट करत असताना पैसे खायला मिळाले नाहीत तर अडथले कसे आणता येतील. याच्यासाठी सर्वजण टपलेले असतात. 


...तर महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा


रतन टाटांसारखे सरळ, सभ्य लोक तुम्हाला आवडतात मग राजकारणी सभ्य का आवडत नाहीत.  आमदार फोडाफोडी करायची आणि राजकारण तापवायचं. एखाद्या पक्षासोबत निवडणुका लढवायच्या आणि परत दुसऱ्या पक्षात जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं. हेच गेल्या पाच वर्षात आपण बघत आहोत. मग नक्की तुम्हाला आवडते काय? आज जर महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार सगळीकडे.