मशीदीवरील भोंग्याविषयी राज ठाकरे यांचा इशारा त्यांच्याच शब्दात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत अखेर मशीदीवरील भोंग्याविषयी इशारा दिला आहे. येणाऱ्या ३ तारखेआधी, म्हणजेच ईद आधी मशीदीवरील भोंगे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत अखेर मशीदीवरील भोंग्याविषयी इशारा दिला आहे. येणाऱ्या ३ तारखेआधी, म्हणजेच ईद आधी मशीदीवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत.तसे न झाल्यास हनुमान चालिसा वाजवली जाईल, हनुमान चालिसाने नाही झालं तर पुढचंही ठरलेलं आहे, माझ्या भात्यातला तो पुढचा बाण अजून मी काढलेला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भोंग्याविषयी राज ठाकरे यांचा इशारा त्यांच्या शब्दात
''३ मे राजी ईद आहे, माझी राज्य सरकारला गृह खात्याला विनंती आहे, कोणतीही दंगल कोणतीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही, आम्हाला ती इच्छा देखील नाही, महाराष्ट्राचं आम्हाला स्वास्थ बिघडवायचं नाही. पण आज १२ तारीख आहे, १२ ते ३ मे महाराष्ट्रातल्या सर्व मशीदीवरील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या, त्यांना सांगा, ३ तारखेपर्यंत सर्व मशीदीवरील लाऊडस्पीकर खाली उतरवले गेले पाहिजेत, खाली काढले पाहिजेत, ३ तारखेनंतर आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.'' पण ३ तारखेनंतर जर भोंगे उतरवले गेले नाहीत, तर तिकडे हनुमान चालिसा वाजवली जाईल.