मुंबई : छोटा राजन २००१ नंतर कुठे होता, याविषयी कुणालाही काहीही माहित नव्हतं, पण जेव्हा 'मिड डे' या इंग्रजी न्यूज पेपरचे पत्रकार ज्योतिर्मय डे (जेडी) यांची पवईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्या हत्येत छोटा राजनचं नाव समोर आलं. यानंतर मुंबईत बिल्डर अजय गोसालिया आणि अरशद शेख यांच्या हत्या प्रकरणातही छोटा राजन गँगच्या लोकांची नावं आली. यानंतर मात्र इंटरपोलने छोटा राजनला अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली. यानंतर पुन्हा २०१५ मध्ये छोटा राजनवर ऑस्ट्रेलियात हल्ला झाला, यानंतर छोटा राजन इंडोनेशियातील बालीत दिसल्याचं सांगण्यात आलं. 


छोटा राजनच्या गुन्हेगारी कारनाम्यांचा अखेर अस्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोटा राजनला अखेर ऑक्टोबर २०१५ मध्ये बालीत जेरबंद करण्यात आलं. भारतीय तपास यंत्रणांसाठी ही एक चांगलीबाब होती. ड्रग्स, हत्यार, जबरदस्ती वसुली, स्मगलिंग आणि हत्येच्या एकूण 70 प्रकरणात आरोपी छोटा राजनला पत्रकार जेडे हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी असल्याचं सांगितलं, यात छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 


छोटा राजनच्या गुन्हेगारी कारनाम्यांचा अखेर अस्त झाला, ज्या मुंबईत ब्लॅकमध्ये छोटा राजन तिकीटं विकत होता, त्याचं मुंबईत न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


या आधीच्या स्टोरीज या क्रमाने वाचा


१) मोठा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन पुढे आला...


२) छोटा राजनच्या नावाची दहशत सुरू झाली या घटनेवरून...


३) दाऊद-छोटा राजनची पहिली भेट, मोठा राजनच्या हत्येचा बदला


४) छोटा राजन आणि दाऊदच्या मैत्रीत असं काही झालं....


५) छोटा राजन आणि दाऊदची 'ही दोस्ती तुटायची नाय'...पण


६) दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!


७) छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"


८) छोटा राजनला अखेर पत्रकाराची हत्या महागात पडली