दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारची एकमेकांवर विविध कारणांनी केली जाणारी कुरघोडी, महाराष्ट्रातील जनता पाहत आहे.राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून २ लस घेतलेल्यांना पास देण्याचा निर्णय घेतला, तर यावर राज्याने केंद्राला याची माहिती द्यायला हवी होती, अशा राजकीय कुरघोडींमध्ये सर्वसामान्यांचा एक विषय अडकला आहे.  यात आणखी पुरस्कारांच्या नाव बदलाचा राहिलेला मागचा विषय पुढे आला आहे. आता राज्यात महाविकास आघाडीकडून आणखी एक नवी राजकीय खेळी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम संस्थेसाठी राजीव गांधी पुरस्कार
''राजीव गांधी खेल रत्न'' पुरस्काराचं नाव बदलून केंद्र सरकारने ते ''घ्यानचंद खेल रत्न पुरस्कार'' असं केलं. यावर आता महाविकास आघाडीने राजीव गाधी यांच्या नावाने पुरस्कार सुरु केला आहे.  राज्य सरकारकडून दिला जाणारा हा पुरस्कार माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम संस्थेसाठी दिला जाणार पुरस्कार असणार आहे. 


माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी राजीव गांधी
देशात माहिती आणि तंत्रज्ञान विकासात पंतप्रधान या नात्याने राजीव गांधी यांनी मोठे योगदान दिले होते. देशातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी राजीव गांधी यांच्या नावे पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या क्रीडा पुरस्काराचे नाव केंद्र सरकार बदललेले होते, त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधी यांच्या नावे पुरस्कार सुरू करण्याचा  महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.