मुंबई : राज्याला अखेर पूर्णवेळ पोलीस महासंचालक (Maharashtra DGP) मिळाले आहेत. रजनीश शेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून उच्च न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे अखेर सरकारकडून रजनीश शेठ (Rajneesh Sheth) यांची पोलीस महासंचालकपदी (DGP) नियुक्ती करण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावल्यानंतर राज्य सरकारने 21 फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली होती. पण राज्य सरकारकडून आजच नियुक्ती करण्यात आली आहे.


- रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
- आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. 
- रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे.