बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री चैत्यभूमीवर
आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्तानं लाखो अनुयायी दादरमधल्या चैत्यभूमीवर जमणार आहेत.
मुंबई : आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्तानं लाखो अनुयायी दादरमधल्या चैत्यभूमीवर जमणार आहेत.
सकाळपासूनच चैत्यभूमीवर गर्दी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोई पुरवण्यात आल्या आहेत. सकाळपासूनच लोकांनी चैत्यभूमीवर गर्दी करायला सुरुवात केली आहे.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची आदरांजली
ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिना-यावर जाऊ नका, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान आज सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी चैत्यभूमीवर महामानवाला आदरांजली अर्पण केली.
पाहा व्हिडिओ