रामराजे शिंदे, झी मीडिया, मुंबई : मुंबई सेंट्रल स्टेशनच्या नामकरणावरून वाद चिघळत चालला आहे. मुंबई सेंट्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलाय. 


ठाकरेंना मोकळे रान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई सेंट्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असे आठवले आज म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी हा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेस सेक्युलर असेल तर आंबेडकराच्या नावाला पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. सरकार आल्यामुळे उद्धव ठाकरेंना रान मोकळे मिळाल्याचेही ते म्हणाले.



'गो कोरोना'वर स्पष्टीकरण 


कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे आतापर्यंत १७ रुग्ण आढळले आहेत. यासाठी सरकारतर्फे निर्देश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एक क्लीप सोशल मीडियात व्हायरल होतेय. त्यात ते गो कोरोना, कोरोना गो असे म्हणत आहेत. 


कोरोनाचा आवर घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना आठवलेंची ही क्लीप हास्याचा विषय ठरत आहे. असं गो कोरोना म्हणून कोरोना जात नसतो अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहे. यावर आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गो कोरोना म्हणण्याचा माझा उद्देश वेगळा होता असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना देशातून नष्ट व्हावा हाच उद्देश होता. करोनाचे बारा वाजवण्यास आम्ही समर्थ आहोत असेही ते म्हणाले.