मुंबई : २०१४ पर्यंत झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली, तर मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्नच उरणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय. जिथे झोपडपट्टी आहे तिथेच एसआरए योजना लागू करण्याचीही सूचना यावेळी आठवलेंनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोपड्या वाढण्यासाठी मुंबईत जागाच उरलेली नाही. उत्तर भारतीयांचं मुंबईत येण्याचं प्रमाणही कमी झालंय. सध्याच्या परिस्थितीत सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना मंजूरी आहे. पण त्यानंतर फारशा झोपड्या तयारच झाल्या नसल्याचा आठवलेंचा दावा आहे. वांद्रे इथले गरीबनगर झोपडपट्टीत अतिक्रमणविरोधी कारवाई दरम्यान भीषण आग लावण्यात आली. त्यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले. या पार्श्वभूमीवर आठवलेंचं हे विधान महत्वाचं आहे. 


रामदास आठवले म्हणाले की, ‘आता झोपड्यांसाठी मुंबईत जागा नाही. मुंबईतील झोपड्यांचा ताण वाढणार नाहीत. आता मुंबईत परराज्यातील लोकं कमी येतात. त्यामुळे २०१४ च्या झोपड्यांना मान्यता दिली तर हा प्रश्न सुटेल’.