उद्धव ठाकरे आजारी; अजितदादांनी डाव साधला, रामदास कदमांचा गंभीर आरोप
प्रशासकीय अनुभवामुळे अजित पवारांनी निधी वाटपात डाव साधला....रामदास कदमांचा गंभीर आरोप
मुंबई : रामदास शिंदे यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केला. यावेळी त्यांनी मंत्रालयतील कारभार आणि सत्तेत असतानाचे निधीवाटपाचे घोळ यावरही संताप व्यक्त केला. रामदास कदम यांनी अजित पवार आणि शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले रामदास कदम
''उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नव्हती तेव्हा ते मंत्रालयात जात नव्हते. अजित पवारांनी याचा फायदा घेऊन आपला डाव साधला जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे त्यांचा आमदार जो पडलेला आहे माजी आमदार त्याला फंडा द्यायचा. शिवसेना संपवण्याचा त्यांचा डाव आहे.
...तर 10 आमदारही निवडून आले नसते
अजित पवारांना प्रशासकीय अनुभव चांगला असल्याने त्यांनी बरोबर डाव साधला. आज एक गोष्ट मी दाव्याने सांगत आहे. एकनाथ शिंदे आणि 51 आमदारांनी बंडखोरीचं हे पाऊल उचललं नसतं तर पुढच्या वेळी विधानसभेला शिवसेनेचे 10 आमदारही निवडून आले नसते. मी अभ्यास केला आहे सगळ्या गोष्टींचा.
पालघरच्या सरपंचाला 5 कोटी दिले आहेत. एका एका सरपंचाला 5 कोटी रुपये दिले आहेत. यादी देतो मी. अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी खजिना लुटला आहे. निधी वाटपात त्यांनी योग्य डाव साधला आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात न येण्यामुळे हे सगळं सुरू राहिलं.''
''पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? ज्या शिवसैनिकांनी उभं आयुष्य शरद पवारांचा विरोध केला आज ते शरद पवार तुम्हाला का हवेत असा प्रश्न संतप्त रामदास कदम यांनी विचारला आहे.''