मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंपाठोपाठ त्यांचे समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे. कोळंबकर आणि आमदार नितेश राणे यांच्यात मुंबईत बंद खोलीत याबाबत चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात विचारले असता, राणे आपले जुने मित्र असून त्यांना नेहमीच साथ असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. काँग्रेसमध्ये कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसंच मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक करत मतदारसंघातल्या विकासकामांना जलदगतीनं मंजुरी मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.


दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मूहुर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. अमित शाहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नारायण राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. यानंतर उद्या नारायण राणेही स्वतः दिल्लीत जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.