शहांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंचं स्पष्टीकरण
![शहांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंचं स्पष्टीकरण शहांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंचं स्पष्टीकरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/06/16/231892-530278-raosaheb-danve-rna1.jpg?itok=JKxA1YGw)
अमित शाह यांचा हा दौरा दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानिमित्त आहे.
मुंबई : अमित शाह यांचा हा दौरा दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानिमित्त आहे. देशभर अमित शाह 95 दिवस फिरत आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. राष्ट्रपती निवडणूक, मंत्रीमंडळ फेरबदल अशा कोणत्याही विषयांवर मुंबईचा दौरा नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
मध्यवर्ती निवडणुकाच्या शक्यता अजिबात नाही. मात्र जरी निवडणूक झाली भाजप त्यासाठी तयार असेल असा इशाराही त्यांनी दिला.. NDA च्या घटक पक्षांना अमित शाह भेटत आहेत, त्यापैकीच उद्धव ठाकरे यांची ही भेट आहे. अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
अमित शाह मातोश्रीवर जाणार असल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. तसेच घटकपक्षांच्या प्रमुखांशी देखील चर्चा करणार आहेत असं बोललं जातं आहे.